सुरेटा डिजिटल वेबसाईट आणि व्हिजिटिंग कार्ड

बँकिंग ते बिझनेस मीटिंग्स पर्यंत, जग डिजिटल होत आहे. त्यामुळे, कोणत्याही यशस्वी व्यापाऱ्यासाठी बिझनेस कार्ड्स असणे आवश्यक आहे जेणे लोक आपल्या संपर्कात राहू शकतात. आता आपण डिजिटल युगात व्यवसाय कार्ड (Digital Visiting Card Online) बनवू शकता तेही मोफत कसे बनवणार कसे वापरणार जाणून घेऊ यात लेखात तर आपल्या सर्व व्यावसायिक मित्रांना आणि आपल्या ग्रुप मध्ये तसेच आपल्या स्टेट्सला शेअर करण्यास विसरू नका. आज पर्यंतचे छापील पारंपारिक व्यवसाय कार्डमध्ये (Visiting Card) फक्त थोडी फार माहिती किंवा मूलभूत संपर्क माहिती असते, जसे की नाव, फोन नंबर, ईमेल पत्ता आणि कंपनीचा लोगो. दुर्दैवाने, कागदी व्यवसाय कार्ड सामान्यतः खिशात किंवा बँग मध्ये पडून खराब होतात विसरले जातात किंवा काळानुसार त्यातील काही माहिती बदल होते आणि ते कार्ड बिनकामी होते.

यात चांगली बातमी अशी आहे की डिजिटल बिझनेस (Visiting Card) कार्ड्स या सर्व समस्यांचे आपल्याला टेन्शन फ्री करते कसे ते आपण या लेखात बघणार आहोत. हे कार्ड कधीही खराब होत नाहीत पाहिजे तेव्हा आपण यातील माहिती बदलू शकतो तसेच एका क्लिक वर सर्व माहिती मिळते. किंवा आपल्या इतर सोशल मिडिया आणि आपल्या कंपनीची किंवा व्यवसायाची वेबसाईट सुद्धा दिसून येते जेणे कि आपले ग्राहक आपल्याशी संपर्कात राहू शकतात. तसेच डिजिटल युगात डिजिटल बिझनेस कार्ड हे नेट्वर्किंग आणि मार्केटिंग साठी वरदान ठरणार आहे.

Visiting Card डिजिटल बिझनेस कार्ड्स म्हणजे काय?

डिजिटल बिझनेस कार्ड हा आपल्या व्यवसाय वाढीसाठी एक वरदान ठरणार आहे सध्या आपण पेपर व्हिजिटिंग कार्ड वर मोजकीच माहिती देऊ शकता आणि त्यात बदल करणे शक्य नाही पण डिजिटल व्हिजिटिंग कार्ड मध्ये आपण आपल्या सोयीनुसार माहिती बदलू शकता पाहिजे तितक्या लोकांना शेअर करू शकतात आणि हे कालांतराने खराब होत नाहीत. यातील काही महत्वाच्या सोई पुढील प्रमाणे आहेत.

 • आपल्या वेबसाईटची लिंक देता येते.
 • आपल्या कंपनी किंवा व्यवसायाचा फोटो अपलोड करता येतो.
 • संपर्क माहिती टाकता येते आणि बदलता सुद्धा येते. 
 • सर्व महत्वाची सोशल मिडिया प्रोफाईल जोडता येतात (व्हाटसअप, इन्स्टाग्राम आणि इतर)
 • एका क्लिक वर फोन लावणे, एका क्लिक वर मेसेज करणे किंवा सोशल मिडिया वर व्हिजीट करणे.

या मध्ये आपल्याला कुणाला आपली माहिती शेअर करायची असल्यास आपण फक्त एक लिंक (url) त्यांना शेअर करायची असते आणि आपले Visiting Card त्यांना मिळते 

Visiting Card

Visiting Card चे व्यापारांना अनेक फायदे

 • किफायतशीर: Visiting Card विनामूल्य आहे. कार्ड स्वतः बनवू आणि अद्यवत करू शकता.
 • सहजतेने शेअर करणे: फक्त एक लिंक (url) आपल्या संपर्कांना शेअर करायची आहे. 
 • सोशल मीडिया : तुमच्या नवीन ग्राहक किंवा संपर्कांना तुमच्या ब्रँडबद्दल जाणून घेण्यासाठी विविध सोशल मिडिया लिंक जोडता येतात. 
 • अपडेट करणे सोपे: पुन्हा नवीन छापत बसायची गरज नाही एकदा माहितीभारा आणि फक्त लिंक शेअर करत चला. 

मी डिजिटल बिझनेस कार्ड कसे तयार करू?

Digital Visiting Card बनवण्यासाठी आपल्याला या http://heptaa.com/ या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे या मध्ये आपल्याला पहिले आपले बेसिक नोंदणी करायची आहे यासाठी कसलेही शुल्क आकारले जाणार नाहीत. पुढील पद्धतीने आपण नवीन Digital Visiting Card बनवू शकता.

 • सर्व प्रथम http://heptaa.com/ या वेबसाईट वर आपण आपले रजिस्ट्रेशन करावे यात आपल्याला आपले इमेल आयडी, पासवर्ड आणि संपर्क क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर.
 • आपण लॉगीन करून Add Card वर क्लिक करावे आणि आपली माहिती भरावी.
 • सर्व माहिती भरून झाल्यास सेव करावे आणि My Buzz वर क्लिक करून एका आपले कार्ड बघून घ्यावे.
 • सर्व काही योग्य वाटत असल्यास आपण त्याची लिंक (URL) कॉपी करून आपल्या सर्व ग्राहक आणि सोशल मिडिया वर शेअर करावी.